जळगाव प्रतिनिधी । राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर मतदार संघात एकतर्फी विजयी आघाडी घेत ते विजयी झालेत. त्यामुळं जामनेरमध्ये कमळ फुललेलं पाहायला मिळतंय. मंत्री महाजन यांन राष्ट्रवादीचे संजय गरूड यांचा पराभव केलाय.
जिल्ह्यातील जामनेर मतदार संघात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पारंपारीक प्रतिस्पर्धी या निवडणुकीत देखील मिळाले होते. राष्ट्रवादीचे संजय गरूड यांनी महाजन यांच्या विरूद्ध अर्ज दाखल केल्यानंतर जामनेर मतदार संघातील निवडणुक एकतर्फी मानली जात होती. परंतु प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात गरूड यांनी मतदार संघात चांगली हवा केली होती.
यामुळे गिरीश महाजन हे शेवटचे तीन दिवस जामनेरमध्ये ठाण मांडून होते. आज मतमोजणीत पहिल्या फेरीपासून एकतर्फी निकालाचे चित्र स्पष्ट होत. त्यामुळं गिरीश महाजन यांचाच विजय होणार हे निश्चित होत. महाजन यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. आणि शेवटच्या फेरीत जामनेरमध्ये मंत्री महाजन विजयी झालेत. त्यामुळं भाजप कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करताना दिसतायेत.