हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपले लग्न एकदम धडाक्यात व्हावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. मात्र सध्या अशा एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे यामध्ये लग्नामध्येच मंडपात असलेल्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हि हाणामारी पाहून नवरा नवरीसह त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हि संपूर्ण हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय घडले नेमके?
नवरा-नवरी स्टेजवर उभे असतात. त्यावेळी नवरी नवऱ्याची ओवाळणी करायला सुरुवात करते. पण स्टेजच्या खाली मंडपात असलेल्या वऱ्हाडी मंडळीमध्ये तुफान हाणामारी होते. हा सर्व धक्कादायक प्रकार पाहून नवरा स्टेजवरून बाजूला जातो. वऱ्हांडी मंडळीत झालेलं कडाक्याचं भांडण पाहून नवऱ्याला काहीच सुचत नाही. या क्षणला काय करावं? याच गोंधळात पडलेला नवरदेव स्टेजवर उभा राहून हा धक्कादायक प्रकार पाहत असल्याचं या व्हिडीओत (Viral Video) दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/ClWYsvtIvyT/?utm_source=ig_embed&ig_rid=2576e63f-d990-4375-8426-dd01d5029999
हि हाणामारी (Viral Video) एवढी जबर आहे कि लोक एकमेकांना खुर्च्या मारताना दिसत आहेत. हि हाणामारी पाहून काही लोक ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तरीदेखील हाणामारी करणारे लोक शांत होताना दिसत नाही आहेत. आर के राज नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका