Group c Cadre In Education Commissionerate | शिक्षण आयुक्तालयात गट क संवर्गात 23 पदांची भरती, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Group c Cadre In Education Commissionerate | आजकाल शिक्षण घेऊन देखील अनेक तरुणांना नोकरी लागत नाही. ते नोकरीसाठी वणवण भटकत असतात आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक तरुणांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीच्या अशाच एका संधीची माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता शिक्षण आयुक्तालयात ही रीक्त पदे भरण्यासाठी मंजूर केलेली होती. त्या रिक्त असलेल्या 80 टक्के पदांवर आता भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. या भरतीमध्ये गट क (Group c Cadre In Education Commissionerate) या संवर्गातील एकूण 23 पदे भरली जाणार आहे.

त्यामुळे या विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. यासाठी 23 मार्च 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला यासाठी अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 8 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेतील परीक्षा ही राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सर्वांना दिलेली आहे.

रिक्त पदे | Group c Cadre In Education Commissionerate

  • या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 23 रिक्त पदे भरली जाणार आहेत
  • यामध्ये मुख्य लिपिक – 6 पदे
  • वरिष्ठ लिपिक – 14 पदे
  • निम्न श्रेणी लघुलेखक – 3 पदे

अशी भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध केंद्रावर घेतली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया 23 मार्चपासून सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज प्रक्रिया सुरू होत असल्यास लवकरात लवकर अर्ज करा. त्याचप्रमाणे अर्ज करताना तुम्हाला तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे गरजेचे आहे. आता या भरती बाबतची पात्रता त्याचप्रमाणे अन्य माहिती तुम्हाला राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर समजेल. त्यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता