हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । GST” ट्रेनने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. ट्रेनच्या तिकिटाचे कमी असलेले भाडे हे देखील यामागील एक कारण आहेत. ट्रेनने प्रवास करण्याची पहिली स्टेप म्हणजे कन्फर्म तिकीट खरेदी करणे. सहसा प्रवासी वेळेत तयारी सुरू करतात मात्र अनेक वेळा प्रवासातील बदलामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना तिकीट रद्द करावे लागते, ज्यावर रेल्वेकडून कॅन्सलेशन चार्ज आकारला जातो. आता या शुल्कावरही GSTलागू होणार केला जाणार आहे ??? असा प्रश्न सध्या प्रवासी उपस्थित करत आहे.
रेल्वे प्रवाशांच्या या प्रश्नावर रेल्वेने स्पष्टीकरण देताना म्हटले की, 23 सप्टेंबर 2017 रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, तिकीट रद्द झाल्यास, रेल्वे नियमांनुसार तिकीट बुक करताना आकारलेला GST देखील तिकिटाच्या किंमतीसह परत केला जातो. मात्र, प्रत्येक तिकीट रद्द करण्यावर, रेल्वे विभागाकडून काही प्रमाणात कॅन्सलेशन चार्ज आकारला जाईल. जो रेल्वेच्या रिफंडच्या नियमांनुसार लागू होईल. आता रेल्वे कडून या कॅन्सलेशन चार्जवरही जीएसटी आकारला जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार हा जीएसटी घेतला जाईल, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, हे शुल्क फक्त एसी आणि फर्स्ट क्लासच्या तिकिटांवरच लागू असेल.
कोणत्या तिकिटावर किती कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागेल ???
रेल्वेच्या सध्याच्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या 48 तासांच्या आत कन्फर्म तिकीट रद्द झाले तर एसी फर्स्ट क्लाससाठी 240 रुपये, एसी टियर 2 साठी 200 रुपये, एसी टियर 3 आणि चेअर कारसाठी 180 रुपये, स्लीपर क्लाससाठी 120 रुपये आणि सेकंड क्लाससाठीच्या तिकिटांवर 60 रुपये कॅन्सलेशन चार्ज आकारले जाईल. हे दर प्रति प्रवासी आकारले जातील.
हे लक्षात घ्या कि, ट्रेन सुटल्यानंतरच्या 12 तासांच्या आत तिकीट रद्द केले तर 25% तिकीट भाडे आकारले जाते,तर जर तेच कन्फर्म तिकीट ट्रेन सुटल्याच्या 4 तासांच्या आत रद्द केले तर भाड्याच्या 50% कॅन्सलेशन चार्ज म्हणून आकारले जातील. GST
रिझर्वेशन चार्ट बनल्यानंतरचा नियम काय आहे ???
हे लक्षात घ्या कि, एकदा रिझर्वेशन चार्ट तयार केल्यानंतर ई-तिकीट रद्द करता येणार नाही. अशा वेळी युझरला TDR ऑनलाइन भरण्यास सांगितले जाते. तसेच युझर्सना हवे असेल तर IRCTC द्वारे त्याचे स्टेट्स देखील ट्रॅक करता येईल. तसेच जर ट्रेन सुटण्याच्या चार तासांपूर्वी तिकीट रद्द केले नाही किंवा TDR दाखल केला नाही तर प्रवाशांना कोणताही रिफंड दिला जाणार नाही. GST
याशिवाय, जर तिकीट RAC असेल तर ते ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी रद्द करता येते. मात्र यानंतर केल्यास कोणताही रिफंड दिला जाणार नाही. जर एखाद्या संपूर्ण कुटुंबाचे किंवा ग्रुपमध्ये तिकीट बुक केले असेल आणि काही प्रवाशांकडे RAC तिकीट असेल तर ते ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी रद्द केले जाऊ शकते. या प्रकरणी कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशाला पूर्ण रिफंड दिला जाईल. GST
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी ! भारत पेट्रोलियममध्ये भरती सुरु
PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!
सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!