ट्वीन टॉवरप्रमाणेच चांदणी चौकातील पूल काही क्षणात जमीनदोस्त होणार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यापद्धतीने स्फोटकांचा वापर करून उत्तरप्रदेशमधील नोयडा येथील अनधिकृत ट्वीन टॉवर अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त करण्यात आला त्याच पद्धतीने पुण्यातील चांदणी चौकातील पूल अवघ्या काही सेकंदात पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनाही कंट्रोल ब्लास्टिंगचा अनुभव मिळू शकतो.

वाहतूक कोंडीला कारण ठरलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल दहा सेकंदात पाडला जाणार आहे. नोएडातील ट्वीन टॉवर पाडलेली संस्था चांदणी चौकातील पूल पाडणार आहे अशी माहिती समोर येत आहे. तसेच या पुलाची आणि परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून एक पथक पुण्यात दाखल होणार असल्याचंही समजतं आहे. कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीच्या सहाय्याने हा पूल पाडण्यात येईल त्यामुळे ट्विन टॉवर प्रमाणे हा पूल देखील 10 सेकंदात जमिनदोस्त होणार आहे.

चांदणी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने हा पूल पाडून दुसरा पूल बांधला जाणार आहे. सुमारे 30 मीटर लांबीचा हा पूल पाडण्यापूर्वी वाहतूकीचं नियोजन करण्यात येईल. तसेच काही वेळेसाठी पुलाखालचा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकात जाऊन पाहणी केली होती आणि पूल पडण्याचा निर्णय घेतला होता.