हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून खाद्यपदार्थांसह इतर काही वस्तूंवरील GST दरात बदल झाल्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा चाप बसला आहे. अनेक जीवनावश्यक वस्तू महागल्या मुळे गृहिणींचे बजेटही कोलमडण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया आजपासून कोणकोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत.
पॅक केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन आणि मटार इ. यावर आता 5 टक्के जीएसटी लागणार आहे. यापूर्वी या पदार्थांवर कोणत्याही प्रकारचा GST नव्हता.
तसेच आजपासून पॅकेट बंद सामानांवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. याआधी पॅकेट बंद सामानांवर फक्त 5 टक्के जीएसटी लागू होता.
नारळ पाणी आणी फुटवेअरच्या कच्च्या मालावरही 12 टक्के जीएसटी लागणार आहे.
GST दरात झालेल्या वाढीचा फटका शाळकरी मुलांनाही बसला आहे. जीएसटी कौन्सिलने, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, एलईडी दिवे, पेपर-कटिंग नाइफ, चित्रकलेसाठी लागणारे साहित्य या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लागू केला आहे,. तसेच चार्ट आणि नकाशा आणि वर 12 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.
आजपासून आरोग्य सेवाही महाग झाली आहे. रुग्णालयातील पाच हजार रुपयांहून अधिक भाडय़ाच्या खोलीवर 5 टक्के जीएसटी लागू होईल.