नवी दिल्ली । पोस्ट ऑफिसच्या बचत योजना खूप खास आहेत. येथे तुम्हाला बँकेपेक्षा चांगला रिटर्न मिळतो, तसेच सुरक्षिततेची सरकारी गॅरेंटीही मिळते. इंडिया पोस्टच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये जास्त चांगला व्याजदर उपलब्ध आहे. या योजनांमध्ये गुंतवून काही काळानंतर तुमचे पैसेही दुप्पट होतील. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा 9 योजनांबद्दल सांगणार आहोत.
1. Post Office Time Deposit
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट या स्कीममध्ये 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे ठेवू शकता. त्यावर वार्षिक 5.5 टक्के व्याज मिळते. जर तुम्ही या योजनेत पैसे ठेवले तर तुमचे पैसे सुमारे 13 वर्षांत दुप्पट होतील. तुम्ही 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिट केल्यास, व्याज दर 6.7 टक्के आहे. या दराने, तुमचे पैसे 11 वर्षांत जवळजवळ दुप्पट होतील.
2. Post Office Savings Bank Account
तुम्ही पोस्ट ऑफिस बचत खात्यात पैसे ठेवल्यास पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. यामध्ये फक्त 4 टक्के व्याज मिळते. या दराने पैसे दुप्पट होण्यासाठी 18 वर्षे लागतात.
3. Post Office Recurring Deposit
सध्या, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) वार्षिक 5.8 टक्के व्याज दर देते. या दराने पैसे दुप्पट करायचे असतील, तर साडेबारा वर्षे वाट पाहावी लागेल.
4. Post Office Monthly Income Scheme
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS) वर सध्या 6.6% व्याज मिळत आहे, जर या व्याजदराने पैसे गुंतवले तर ते 10.91 वर्षात दुप्पट होतील.
5. Post Office Senior Citizen Scheme
सध्या पोस्ट ऑफिस सीनियर सिटिजन सेविंग्स स्कीम (SCSC) वर 7.4% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत, तुमचे पैसे सुमारे 9.73 वर्षांत दुप्पट होतील.
6. Post Office PPF
पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या 7.1% व्याज मिळत आहे. म्हणजेच, या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10.14 वर्षे लागतील.
7. Post Office Sukanya Samruddhi Account
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेवर सध्या सर्वाधिक 7.6 टक्के व्याज मिळत आहे. मुलींसाठी चालवल्या जात असलेल्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 9.47 वर्षे लागतील.
8. Post Office National Saving Certificate
सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 6.8% व्याज दिले जात आहे. ही 5 वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून इन्कम टॅक्स देखील वाचवता येतो. जर या व्याजदराने पैसे गुंतवले गेले तर ते सुमारे 10.59 वर्षांत दुप्पट होईल.
9. Kisan Vikas Patra / KVP
या योजनेत 01.04.2020 पासून 6.9% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. गुंतवलेली रक्कम 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते.