महिला नगरसेविकेचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल : तू पुरूष असशील आणि तुझ्यात दम असेल तर…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

तू पुरूष असशील आणि तुझ्यात दम असेल तर कर की तक्रार महिला नगरसेविकाचा व्हाॅटसअप वरील मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कराड नगरपालिकेचा पंचवार्षिक कार्यकाल संपला आहे आणि दुसऱ्याच दिवशी सोशल मिडियावर या मेसेजने खळबळ उडवून दिली आहे. कराड शहरातील बॅनरवरून हा वाद टोकाला गेल्याचे पहायला मिळत आहे.

कराड शहरात गेल्या काही दिवसापूर्वी कृष्णा कारखान्यांची निवडणूक डाॅ. सुरेश भोसले व डाॅ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनेलने जिंकल्यानंतर आता लक्ष्य कराड नगरपरिषद असा फलक लावण्यात आला होता. याबाबत कराडच्या तत्कालीन नगराध्यक्षा रोहीणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यावर नगरसेविका स्मिता हुलवान यांनी तक्रार केली होती. त्यानंतर शहरातील राजकारण चांगलेच तापले होते.

गेल्या काही दिवसापूर्वी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचेही फोटो असलेले बॅंनर लावण्यात आले होते. त्यामुळे कृष्णा कारखाना निवडणूकीच्या विजयानंतर लावण्यात फलक प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता नगरपालिका पालकमंत्री यांचा फोटो असलेल्या बॅंनरवर कारवाई करण्या बाबतची बातमीवर महिला नगरसेविकेने मेसेज केला आहे. मेसेजमध्ये महिला नगरसेविकेने म्हटले आहे, तू पुरूष असशील आणि तुझ्यात दम असेल तर कर की तक्रार…माझा बाल हट्ट काय ते योग्यवेळी कळेल तुला…