हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : अनेक लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. मात्र अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे म्हणा कि व्यवसायाची योग्य कल्पना नसल्यामुळे म्हणा अनेकांना तो सुरू करता येत नाही. मात्र जर आपण आपल्या दररोजच्या आयुष्याकडे बारकाईने लक्ष दिले तर आपल्या अवतीभवतीचं व्यवसायाच्या अशा अनेक कल्पना सापडतील, ज्याद्वारे आपल्याला चांगले उत्पन्न मिळवता येईल. याशिवाय असेही अनेक व्यवसाय आहेत ज्यासाठी सरकारकडूनही मदत मिळेल. Business Idea
तर आज आपण चांगली कमाई करता येऊ शकणाऱ्या कार्डबोर्ड म्हणजेच पुठ्ठ्याच्या खोक्यांच्या व्यवसायाबाबत चर्चा करणार आहोत. सध्याच्या काळात ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांकडे माल पोहोचवण्यासाठी मजबूत पुठ्ठ्याची गरज असते. ज्यामुळेच त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय आपल्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरू शकेल. चला तर मग या व्यवसायाबाबतची सर्व माहिती तपशीलवारपणे जाणून घेऊयात…
‘या’ गोष्टींची आवश्यक असेल
कार्डबोर्ड म्हणजे जाड कव्हर किंवा पुठ्ठा असतो. ज्याचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. या व्यवसायासाठी आपल्याला जवळपास 5000 चौरस फूट जागा लागेल. इतकंच नाही तर यासाठी एक प्लॅन्ट आणि बनवलेला माल ठेवण्यासाठी गोदामाचीही गरज भासेल. तसेच यासाठी सेमी ऑटोमॅटिक आणि फुल ऑटोमॅटिक मशीनची देखील ग्यावा लागतील. त्याच बरोबरच कच्चा माल म्हणून क्राफ्ट पेपरची आवश्यकता असेल. हे लक्षात घ्या कि, आपण जितके जास्त क्राफ्ट पेपर वापरु तितकेच आपले बॉक्स देखील जास्त दर्जेदार बनतील. Business Idea
किती गुंतवणूक लागेल ???
छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सेमी ऑटोमॅटिक मशीन घ्यावी लागेल. ज्यासाठी 20 लाख रुपये गुंतवावे लागतील. तसेच, फुल्ली ऑटोमॅटिक मशीन खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च करावे लागतील. Business Idea
किती पैसे मिळतील ???
या व्यवसायामध्ये भरपूर नफाही मिळतो. तसेच चांगले मार्केटिंग करून आणखी ग्राहकही जोडता येतील. अशा प्रकारे या व्यवसायातून दर महिन्याला सुमारे 5 ते 10 लाख रुपये मिळू शकतील. Business Idea
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाला बदल, जाणून घ्या नवीन दर
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुक करून मिळवा दुप्पट बोनस !!!
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 400 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा 750GB डेटा
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न, कसे ते जाणून घ्या
Bank Of Baroda कडून FD वर मिळणार 7.80% पर्यंत व्याज, याचा लाभ कसा घ्यावा ते पहा