SBI च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा खात्रीशीर उत्पन्न !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI कडून ग्राहकांच्या गरजेनुसार वेळोवेळी अनेक योजना लाँच केले जातात. मात्र काही लोकांना आपले पैसे अशा प्रकारे गुंतवायचे असतात जेणेकरून त्यांना भविष्यात एकरकमी रक्कम मिळू शकेल. तर काही लोकांना आपले पैसे अशा प्रकारे गुंतवायचे असतात जेणेकरून त्यांना दरमहा एक निश्चित रक्कम मिळेल. जी त्यांना रिटायरमेंटनंतरची पेन्शन म्हणून वापरता येऊ शकेल. यामुळे ग्राहकांनी एकदा SBI annuity deposit scheme वर एकदा नजर टाकावी. या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला एकरकमी रक्कम जमा करून निश्चित कालावधीनंतर दर महा उत्पन्न मिळेल.

SBI Annuity Deposit Scheme: Earn guaranteed monthly income with single  lump-sum investment

हे जाणून घ्या कि, SBI च्या या योजनेमध्ये ग्राहकांना दरमहा मूळ रकमेसहीत व्याज दिले जाते. तसेच हे व्याज खात्यातील शिल्लक रकमेवर प्रत्येक तिमाहीमध्ये चक्रवाढ पद्धतीने मोजले जाते. या योजनेमध्ये बँकेच्या एफडीइतकेच व्याज मिळते. तसेच, जर ग्राहकाने SBI च्या FD मध्ये पैसे गुंतवले तर त्याला बँकेने ठरवून दिलेल्या मुदतीनुसार मुदतपूर्तीच्या तारखेला मॅच्युरिटीच्या रकमेवर व्याजासहीत एकरकमी पैसे दिले जातील.

ICICI Bank, Yes Bank revise their Fixed Deposit (FD) rates: Check new rates  here - BusinessToday

असे आहेत एफडीवरील व्याजदर

7 ते 45 दिवस – 3 टक्के
46 ते 179 दिवस – 4.5 टक्के
180 ते 210 दिवस – 5.25 टक्के
211 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – 5.75 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 6.75 टक्के
2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी – 6.75 टक्के
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी – 6.25 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.25 टक्के

SBI Annuity Deposit Scheme This scheme of SBI is of great use once you  deposit money you will earn every month - Business News India - SBI Annuity  Deposit Scheme: बड़े काम

प्रत्येक महिन्याच्या निश्चित तारखेला मिळेल अ‍ॅन्युइटी

SBI च्या या योजनेत, डिपॉझिटच्या पुढील महिन्यातील देय तारखेपासून अ‍ॅन्युइटी दिली जाईल. जर ती तारीख कोणत्याही महिन्यात नसेल (29, 30 आणि 31), तर वार्षिकी पुढील महिन्याच्या तारखेला मिळेल. तसेच यामध्ये टीडीएस कापून ते लिंक केलेल्या बचत खात्यामध्ये किंवा चालू खात्यामध्ये जमा केल्यानंतर वार्षिकी दिली जाईल.

SBI Annuity Deposit Scheme - IndiaFilings

SBI अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीम

एसबीआयच्या वेबसाइट वरील माहितीनुसार, या योजनेमध्ये 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी डिपॉझिट ठेवता येतील. हे जाणून घ्या कि, SBI च्या सर्व शाखांमध्ये ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये जास्तीच्या डिपॉझिटची कोणतीही मर्यादा नाही. तसेच कमीत कमी अ‍ॅन्युइटी 1000 रुपये प्रति महिना आहे. यामध्ये ग्राहकांना युनिव्हर्सल पासबुक देखील देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही भारतीय नागरिकाला हे खाते उघडता येऊ शकेल. तसेच अल्पवयीन मुलांना देखील या योजनेची सुविधा मिळते. यासोबत सिंगल किंवा जॉइंट दोन्ही पद्धतीनेही खाते उघडता येते.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/deposits/annuity-deposit-scheme

हे पण वाचा :
LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!
Jio कडून कमी किंमतीत भरपूर डेटा देणारे 2 रिचार्ज प्लॅन लॉन्च, जाणून घ्या या प्लॅनचे अतिरिक्त फायदे
Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या
Gram Suraksha Yojana द्वारे दररोज 50 रुपयांची बचत करून मिळवा 35 लाख रुपये
Multibagger Stock : चॉकलेट बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले तिप्पट