हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC : भारतातील सर्वांत मोठी सरकारी इन्शुरन्स कंपनी LIC आहे. देशातील अनेक लोकांनी LIC च्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली आहे. LIC कडून नुकतेच धन वर्षा योजना नावाची पॉलिसी लाँच करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना दोन पॉलिसी टर्म निवडण्याची सुविधा दिली जाते आहे. यामध्ये एकदाच प्रीमियम भरावा लागेल. तसेच यामध्ये ग्राहकांना मॅच्युरिटीवर गॅरेंटेड बोनस, प्रीमियमच्या दहापट रिस्क कव्हरसहित अनेक फायदे देखील दिले जातील.
धन वर्षा पॉलिसीमध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभरासाठी लाइफ कव्हरसहीत गॅरेंटेड मॅच्युरिटी बेनेफिट्स देखील मिळेल. तसेच या पॉलिसीच्या कालावधी दरम्यान या योजनेशी संबंधित व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला रोख मदत दिली जाईल. याचबरोबर यामध्ये मॅच्युरिटीवर उर्वरित आयुष्यासाठी पेमेंटची गॅरेंटी मिळते.
)
इन्शुरन्स सहित बचतही होणार
हे लक्षात घ्या कि, LIC ची धन वर्षा पॉलिसी ही एक नॉन पार्टिसिपेटिंग, पर्सनल, सेव्हिंग, सिंगल प्रीमियम लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. याद्वारे ग्राहकांना इन्शुरन्स कव्हर सहित सेव्हिंग करण्यासही मदत होईल. LIC च्या लिस्टमध्ये 866 व्या क्रमांकावर असलेली ही योजना मेडिकल आणि नॉन मेडिकल योजनांसाठी देखील उपलब्ध आहे.
या पॉलिसीमध्ये ग्राहकांना सम अश्योर्ड निवडता येईल. तसेच यामध्ये पॉलिसीच्या प्रीमियम रकमेच्या 10 पट सम अश्योर्ड घेता येऊ शकेल. सम अश्योर्ड ही एक निश्चित रक्कम आहे जी इन्शुरन्स कंपनीकडून मॅच्युरिटीवर ग्राहकाला मिळते. यामध्ये आपल्याला 50 हजार रुपयांच्या प्रीमियमसाठी 5 लाख रुपयांचा सम अश्योर्ड घेता येईल.

10 पट पर्यंत रिस्क कव्हर उपलब्ध
हे लक्षात घ्या कि, धन वर्षा पॉलिसी ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. ज्याअंतर्गत फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. तसेच यामध्ये प्रीमियमच्या 10 पट रिस्क कव्हर घेता येईल. यामध्ये आपल्याला दोन पर्याय मिळतील. यातील पहिला पर्याय निवडल्यावर, सम अश्योर्ड हा जमा केलेल्या प्रीमियमच्या 1.25 पट असेल. म्हणजेच, जर एखाद्याने 10 लाख रुपयांचा एकरकमी प्रीमियम भरला आणि त्याचा मृत्यू झाला, तर नॉमिनीला गॅरेंटेड बोनससह 12.5 लाख रुपये मिळतील.
तसेच या योजनेच्या दुसऱ्या पर्यायामध्ये, जमा केलेल्या प्रीमियममधून 10 पट रिस्क कव्हर मिळेल. म्हणजेच इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला 10 पट रोख मदत दिली जाईल. म्हणजेच 10 लाख सिंगल प्रीमियम भरल्यास त्याच्या कुटुंबाला गॅरेंटेड बोनससह 1 कोटी रुपये मिळतील.
ही पॉलिसी ऑनलाइन उपलब्ध नाही
LIC ची धन वर्षा योजना ऑनलाइन खरेदी करता येणार नाही. हा प्लॅन फक्त ऑफलाइनच उपलब्ध असेल. तसेच यामध्ये दोन टर्म ऑफर केल्या जातील. यातील पहिला एक 10 वर्षांचा असेल तर दुसरा 15 वर्षांचा असेल.

किती वय असावे ???
या पॉलिसीमधील दोन्ही पर्यायांमध्ये जर आपण 15 वर्षांच्या मुदतीची निवड केली तर पॉलिसी घेण्यासाठीचे किमान वय 3 वर्षे असेल. जर आपण 10 वर्षांची मुदत निवडली तर किमान वय 8 वर्षे असेल. दुसरीकडे, पहिल्या पर्यायामध्ये,आपले जास्तीत जास्त वय 60 वर्षे असावे. तसेच जर आपण 10 पट रिस्क कव्हर घेत असाल, तर 10 वर्षांच्या मुदतीसह 40 वर्षे वयापर्यंतच या योजनेमध्ये सामील होता येईल. तसेच दुसऱ्या पर्यायामध्ये जर आपण 15 वर्षांची मुदत घेतली तर जास्तीत जास्त वय 35 वर्षे असेल.
इन्स्टॉलेशनमध्ये घेता येतील पैसे
या पॉलिसीमध्ये ग्राहकांना लोन आणि सरेंडरची सुविधा देखील दिली जाते. त्याचवेळी, इन्शुरन्स कव्हर घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर नॉमिनीकडून मिळालेले पैसे हप्त्यात पेन्शन म्हणून घेण्याचा पर्याय देखील मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Dhan-Varsha-(Plan-No-866,-UIN-No-512N349V01)
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर




