Guava Farming | चांगल्या पगाराची नोकरी सोडून तरुणाने केली पेरूची लागवड; आज कमवतोय करोडो रूपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | याआधी शेतीकडे लोक जास्त गांभीर्याने पाहत नव्हते. जे खेड्यात राहणारे शेतकरी आहेत. ते पारंपारिक पद्धतीने शेती (Farming) करत होते. परंतु अलीकडच्या काळात जर आपण पाहिले तर अनेक तरुण देखील शेती या व्यवसायामध्ये उतरत आहेत. अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत. आजकाल शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे अनेक तरुण हे तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. काही तरुण तर असे देखील आहेत, जे चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये चांगला व्यवसाय करत आहेत. आज देखील आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. या तरुणाने चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली आणि शेती व्यवसाय सुरू केला. या तरुणाचे नाव राजीव भास्कर असे आहे. हा तरुण हरियाणामध्ये राहतो. त्याने पेरूच्या (Guava Farming ) शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तो त्या पेरूच्या शेतीतून आज कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न घेत आहे.

2017 पासून शेती करण्यास सुरुवात | Guava Farming

राजीव भास्करने 2017 मध्ये त्याची नोकरी सोडून दिली. त्यानंतर त्याने शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी पंचकुला येथे पाच एकर जमीन भाड्याने घेतली. आणि तिथे थाई पेरूची लागवड केली. त्यातून त्याला लाखो रुपयांचा नफा झाला. विशेष म्हणजे या तरुणांनी सेंद्रिय पद्धतीने या पेरूचे पीक घेतले. त्यामुळे त्याला कमी खर्चात चांगला नफा झाला. 2017 मध्ये त्याला 20 लाखांचा नफा झाला. यानंतर राजीवने पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इतर दोन जणांना सोबत घेऊन पंजाबमधील रुद्रकर येथे 55 एकर जमीन भाड्याने घेतली. यामधील 25 एकरवर त्याने थाई पेरूची लागवड केली आणि या पेरूच्या बागेमध्ये तो कोट्यावधी रुपये कमवत आहे.

सेंद्रिय खतांचा वापर

राजीव भास्करने भाड्याने जमीन घेतली आणि त्यामध्ये तो पेरूची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहे. ही लागवड करताना त्याने शेतात पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. त्याने कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरले नाही. त्याचप्रमाणे किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी पेरूच्या बागेला थ्री लेयर बँकिंग तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. राजीव भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये पेरूची विक्री केली जाते. दिल्लीच्या बाजारात तो पेरूची पॅकिंग करून पाठवतो. त्याला प्रति एकर 6 लाख रुपयांचा नफा मिळतो.