हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये नव वर्षाला सुरुवात होते ती गुढीपाडव्याच्या सणापासून. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण (Gudi Padwa 2024) मोठ्या थाटामाटात साजरी केला जातो. यादिवशी प्रत्येक घरोघरी गुढी उभारण्यात येते. तसेच, गोडामध्ये पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. तर यादिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघते, देवी-देवतांची पूजा करण्यात येते. अशा पद्धतीने महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरी केला जातो. त्यामुळे यावर्षी देखील 9 एप्रिल हा सण उत्सवात साजरी केला जाईल. त्यापूर्वी गुढीपाडवा सणाचे महत्त्व आणि शुभमुहूर्त जाणून घ्या.
गुढीपाडवा सण शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2024)
यावर्षी गुढी उभारण्यासाठीचा शुभमुहूर्त मंगळवारी ही 9 एप्रिल रोजी सकाळी 06.02 वाजेपासून 10.17 पर्यंत आहे. या शुभमुहूर्ताच्या कालावधीत तुम्ही देवी देवतांची आणि गुढीची पूजा करू शकता. महत्वाचे म्हणजे, पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजल्यापासून 9 एप्रिल रोजी रात्री 8.30 मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे गुढीपाडवा सण 9 एप्रिल रोजी साजरी केला जाईल.
गुढी पाडव्याचे महत्व
रब्बी पिकांच्या कापणीचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा सण साजरी केला जातो. गुढीपाडवा सणाच्या पुढे शेतकऱ्यांचेही शेती व्यवसयातील नववर्ष सुरु होते. त्यामुळे गुढीपाडवा हा सण शेतकऱ्यांसाठी देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या सणाबद्दल हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या स्मरणार्थ देखील गुढीपाडवा सण साजरी केला जातो. त्यामुळेच महाराष्ट्रात या दिवशी विजयाचे ध्वज फडकवण्यात येतात. यातील गुढी ही विजय आणि समृद्धीची प्रतीक मानली जाते.
पौराणिक कथा (Gudi Padwa 2024)
पौराणिक कथेत असे लिहिले आहे की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेले कळकाची काठी जमिनीमध्ये रोवली होती. या काठीची पूजा करून त्याने नववर्षाला सुरुवात केली. दुसरी पौराणिक कथा असे सांगते की, प्रभू श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येत परतल्यानंतर तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरी करण्यात आला होता. तसेच याच दिवशी पार्वती आणि शंकराचे लग्न झाले होते असे देखील मानले जाते. अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.