WHO कडून गाईडलाईन्स जारी… पहा ‘मेडिकल मास्क’ की ‘फॅब्रिक मास्क’, कोणता आहे सुरक्षित?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाभारत कहर माजावला आहे. अशा वेळेत मास्क घालणे सोशल डिस्टनसिंग पाळणे महत्वाचे ठरले आहे. पण मास्क वापरण्याबाबत महत्वपूर्ण माहिती जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) दिली आहे. मेडिकल मास्क की फॅब्रिक मास्क कोणता मास्क कोणी वापरावा? आणि कोणता मास्क सुरक्षित आहे? याबद्दल माहिती दिली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणता मास्क कोणी वापरणं योग्य आहे याची माहिती दिली आहे.

मेडिकल मास्क कोणी वापरावा
-आरोग्य कर्मचारी.
– ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत.
– जे लोक करोना रुग्णांची काळजी घेत आहेत.
– ज्या ठिकाणी कोरोनाचा व्यापक प्रसार झाला आहे. कमीत कमी एक मीटर अंतरावर सोशल डिस्टंसिंग अशा नियमांचं पालन करणं कठीण असेल अशा
ठिकाणी मेडिकल मास्क वापरणे आवश्यक आहे.
– ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असे ज्यांना कोणताही आजार असेल अशा लोकांनी देखील मेडिकल मास्क वापर करावा.

फॅब्रिक मास्कचा वापर कोणी करावा
-ज्या लोकांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत.( यात समाजसेवक, कॅशियर यांच्याशी संपर्कात येणाऱ्या लोकांचा देखील समावेश आहे )
– सार्वजनिक ठिकाणी, गर्दी असणाऱ्या ठिकाणी,कार्यालय, किराणा स्टोअर अशा वातावरणात फॅब्रिक मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.

मेडिकल मास्क एकदाच वापरता येतो. हे मास्क वापरल्यानंतर त्यांचे योग्य विघटन करणे गरजेचे आहे मेडीकल मास्कला सर्जिकल मास्क असंही म्हणता येते. फॅब्रिक मास्क पुन्हा वापरण्यायोग्य नसतो. फॅब्रिक मास्क प्रत्येक वापरा नंतर कोमट पाण्याने धुणे आवश्यक आहे.

You might also like