ज्युनिअर पांड्याला घेऊन गुजराती गाण्यावर थिरकला राशिद खान

Rashid Khan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरात टायटन्स या संघाचा नव्याने समावेश झाला आहे. या संघाने आत्तापर्यंत आपल्या कामगिरीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. त्यांनी आतापर्यंत 9 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा संघ 16 प्वॉइंट्ससह गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे संघात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्टार खेळाडू राशिद खान कॅप्टन हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्याला घेऊन डान्स करताना दिसत आहे. या दोघांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CdDdsYlo-co/?utm_source=ig_embed&ig_rid=05ce466b-901f-4ba5-b0e1-46b2a370cbdd

गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी आदल्या दिवशी गुजरातचा स्थापना दिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यातीलच एक क्यूट व्हिडीओ रशीद खानने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रशीद खान गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्याला आपल्या मिठीत उचलुन घेऊन बॉलिवूड चित्रपट लवयात्रीच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

राशिद खानने यावेळी पिंक कलरचा कुडता तर ज्युनिअर पांड्यानेदेखील एम्ब्रॉईडी केलेला कुडता परिधान केला होता. यामध्ये अगस्त्या खुपच सुंदर दिसत आहे. रशीद खानचा हा व्हिडिओ गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची पत्नी नताशानेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

हे पण वाचा

फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा तपास नव्याने करावा लागेल

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा ! ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा गरुडने रचला इतिहास

राणा दाम्पत्याला BMC ची नोटीस; अवैध बांधकामाचा ठपका

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय ?? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच

कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांनी राज ठाकरेंना सुनावले