संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला; पूर्ण इतिहास माहित नसेल तर ….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्यांच्या या दाव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी राज ठाकरेंचा दावा खोडून काढत जर आपल्याला इतिहास पूर्णपणे माहित नसेल तर त्या विषयाला हात घालू नये असं म्हंटल आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी जे विधान केलं ते इतिहासाला धरून नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली नाही. .एखाद्या जबाबदार नेत्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. इतिहास पूर्णपणे 100 टक्के माहित असेल तरच त्याविषयी बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये असे संभाजीराजे यांनी म्हंटल.

छत्रपतींचा घराण्याचा वंशज या नात्याने मी सांगू इच्छितो की शिवरायांची ती समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही. महात्मा फुलेंनी ही समाधी 1925 मध्ये बांधली पण या समाधीचे श्रेय सर्व शिवभक्तांचे आहे. असेही संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच आपल्या आगामी राजकीय कारकिर्दी बद्दल लवकरच मुंबई किंवा पुण्यात आपण बोलणार आहोत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संभाजी राजे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे