जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी
जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान शिवतीर्थ राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांची सभा आयोजित करण्यात आली होत.
यावेळी देवकर म्हणाले की जळगाव मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षापासून भाजपाचे खासदार सातत्याने निवडून येत होत. त्यांच्या कालावधीमध्ये मतदारसंघाचा कसा विकास झाला याची माहिती जनतेला आहे. त्यामुळे त्यांचावर जनता नाराज आहे .
यावेळी प्रभारी दिलीप वळसे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांच्यासह अनेक आमदार, आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.