मुंबई | मराठा आरक्षणा विरोधात याचिका टाकणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज मुंबई उच्च न्यायालया बाहेर हल्ला झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या नंतर सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका टाकल्याच्या कारणाने त्यांचायवर हल्ला केला. हल्ला करणारे कार्यकर्ते हे एक मराठा लाख मराठा घोषणा देत होते.
हाती आलेल्या माहितीनुसार, एड. सदारत्ने मुंबई उच्च न्यायालयात आले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला. वैद्यनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने सदर हल्ला केला. यावेळी पाटील यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्याचे समजत आहे. हल्ला करणारे वैद्यनाथ पाटील जालना जिल्हातील रहिवासी असून ते कोणत्या राजकिय पक्षाशी संलग्नित आहेत का याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने केला. पण या कायद्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील हे उद्या याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान दिलं आहे. यामुळे आता त्यांना निनावी धमक्यांचे फोन येत आहेत. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं सदावर्ते यांनी सांगितलं.