Saturday, June 3, 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेवर थाटले गोरक्षा केंद्र

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई 

अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील बहुचर्चित मुलींच्या शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अधिकृत रिकाम्या जागेवर गोरक्षण केंद्र उभारले आहे. परंतु या जागेवर मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असतांना देखील बांधकाम करण्यास अडथळा निर्माण होत असून धार्मिक भावनेत वसतिगृहाचे बांधकाम अडकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वसतीगृहाचा प्रश्न विळख्यात आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील नेताजी चौक येथील शेत सर्वे न.५३ असलेली क्षेत्रफळ ३० आर ही जागा शासनाची असून या शासकीय जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून महर्षी गोरक्षण संस्थेने अतिक्रमण करत गोरक्षण थाटले आहे. मात्र आता ज्या ठिकाणी गोरक्षण आहे त्याठिकाणी आर्थिक दुष्टा मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे कामाला मंजुरात मिळाली आहे त्यासाठी ४ कोटी ८४ लाख रुपये मंजूरात आले आहे. मात्र शासकीय जागेवर अतिक्रमण करून गोरक्षण थाटण्यात आल्याने या ठिकाणी वसतिगृहाचे बांधकाम करण्यात अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण जागेवरील अतिक्रमण काढण्याची तयारी शासनाने केली होती मात्र या जागेवरील बेकायदेशीर रित्या असलेले गोरक्षण हटवण्यास बजरंग दल व गोरक्षकांचा विरोध असल्याने प्रश्न सुटला नाही .त्यामुळे यात काही लोकांनी धार्मिक मुद्दा केला आहे, एकीकडे गाय जगवण्यासाठी धडपड तर दुसरीकडे शिक्षणाचा मुद्दा यात मागासवर्गीय मुलींच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या ठिकाणी गोरक्षण राहले पाहिजे यासाठी बजरंग दल आक्रमक आहे मात्र मंजूर निधी असतांना सुध्दा या ठिकाणचे अतिक्रमण काढल्या जात नाही कारण या ठिकाणी अनेकदा आंदोलने झालीत

या प्रकरणा संदर्भात माहिती देण्यास अधिकारी सुद्धा टाळाटाळ करीत आहे. ट्रस्टच्या मागणी वरून संबंधित जागा खाली करण्यासाठी पुन्हा 23 मे ही तारीख देण्यात आली,तर यावेळी कल्याण विभाग व स्थानिक चांदुरबाजार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात जागेची आखणी केली यावेळी अधिकारीसह पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.