फलटण | झिरपवाडी (ता. फलटण) येथे फलटण शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यास सापळा रचुन अटक केली. यावेळी 719 किलो गुटखा व पिकअप असा मिळून 15 लाख 43 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. योगेश विलास सरगर (रा. मिरज जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याची चोरटी वाहतुक होणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांना मिळाली होती. फलटण- सांगली मार्गावर झिरपवाडी गावच्या हद्दीत सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पिकअप गाडी क्रमांक (एमएच- 10- एक्यू- 4238) या गाडीस थांबविण्यात आले. गाडीची तपासणी केली असता गाडीत विमल केसरी युक्त पानमसाला, व्ही 1, सुगंधी तंबाखू प्रिमियम R.M.D. पान मसाला असा एकुण 719.1 किलो वजनाचा 10 लाख 43 हजार 200 रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला. या प्रकरणी सदर किंमतीचा गुटखा व पाच लाख रुपये किंमतीची पिकअप असा एकुण 15 लाख 43 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्ह्यातील संशयीत आरोपी योगेश सरगर याला अटक केली असुन त्यास न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी, सातारा विकास सोनवणे यांनी फिर्याद दिली असुन तपास सपोनि नितिन शिंदे हे करीत आहेत. सदर कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि नितिन शिंदे, सहाय्यक पोलिस फौजदार संतोष कदम, पोलिस हवालदार निलेश काळोखे, विजय खाडे, चंद्रकांत काकडे, विठ्ठल विरकर, पोलिस नाईक अमृत कर्पे, पोलिस कॉन्स्टेबल अच्युत जगताप, राजेंद्र नरुटे यांनी केली