Gyanvapi Case: ज्ञानव्यापीच्या तळघरातच हिंदू पूजा करणार! हायकोर्टाने फेटाळली मशीद कमिटीची याचिका

Gyanvapi Mosque
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ज्ञानव्यापी मशीदीच्या वादाप्रकरणी (Gyanvapi Case) एक मोठी बातमी समोर आली आहे. अलाहाबाद हायकोर्टाने मशीदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच मशीद कमिटीची याचिका फेटाळून लावली आहे. महत्वाचे म्हणजे, हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. परंतु अर्जात सुधारणा करावी, असा सल्ला हायकोर्टाकडून कमिटीला देण्यात आला आहे.

कोर्टाने काय म्हणले? (Gyanvapi Case)

गेल्या काही दिवसांपूर्वीच वाराणसी कोर्टाने हिंदू पक्षाला मशीदीच्या तळघरात पुजा करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या निकालाला आव्हान देणारी याचिका ज्ञानवापी मशीद समितीने अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली होती. याच याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी “17 जानेवारीच्या कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही” असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले.

त्याचबरोबर या प्रकरणाचा निकाल देताना, हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या निकालाला (Gyanvapi Case) स्थगिती देण्याचा अर्ज देखील नाकारला. याबरोबर मशीन कमिटीने 6 फेब्रुवारीपर्यंत आपल्या अपिलात सुधारणा करावी, असे हायकोर्टाने सांगितले. आता पुन्हा एकदा हाय कोर्टाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे मशीद कमिटीला याचा मोठा धक्का बसला आहे. यावर आता मशीद कमिटी कोणती भूमिका घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.