ज्ञानवापी मशीद प्रकरण : कोर्टाने मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

0
102
Gyanvapi Mosque
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया समितीची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने पाच महिला हिंदू पक्षांच्या बाजूने निकाल दिला आहे. तसेच या खटल्याची पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

ज्ञानवापी संकुलातील शृंगार गौरीसह अन्य धार्मिक स्थळांवर नियमित पूजा करण्यास परवानगी देण्याची मागणी हिंदूंच्या वतीने करण्यात आली. त्याच वेळी, हे प्रकरण न्यायालयात टिकवून ठेवण्यायोग्य नसल्याचा युक्तिवाद करत मुस्लिम बाजूने हे प्रकरण बरखास्त करण्याची मागणी केली होती. मुस्लीम बाजूचा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, या प्रकरणाची सुनावणी नागरी प्रक्रिया संहितेच्या आदेश 07 नियम 11 अंतर्गत होऊ शकते.

दरम्यान, आज संपूर्ण भारत आनंदी आहे. माझ्या हिंदू बंधू-भगिनींनी उत्सव साजरा करण्यासाठी दिवे लावावेत अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्या मंजू व्यास यांनी दिली तर दुसरीकडे आमच्या बाजूने निकाल आला नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे खुले असून आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असे मुस्लीम पक्षाचे वकील मोहम्मद तौहीद यांनी म्हंटल.