ढाले नसते तर कदाचित मंत्री झालो नसतो – रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी  |सुनील शेवरे , 

आमच्यात संवाद नव्हता पण कोणताही वाद नव्हता, सिद्धार्थ हॉस्टेल मधील आठ्वणीं माझ्या मनात आजही ताज्या आहेत. बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचं सामर्थ्य त्यांच्या साहित्यात होतं. ढाले यांच्याशी ज्यांची भेट झाली नाही पण साहित्याच्या माध्यमातून ते सर्व लोकांपर्यंत पोचले होते. या पूर्वीही मी म्हणालो की राजा ढाले नसते तर मी कदाचित मंत्री पदी विराजमान होउ शकलो नसतो. असं प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन येथे सांस्कृतिक संम्यक समिती ,परशुराम वाडेकर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सीमाताई आठवले , शरणकुमार लिंबाळे, अर्जुन डांगळे, दीक्षा ढाले, गाथा ढाले, राज्यमंत्री महाराष्ट्र अविनाश महातेकर, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.

अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ )

शेवटच्या माणसाने सुद्धा तितकीच लढाई लढली पाहिजे, या मताचे राजा ढाले होते. आंबेडकरी चळवळीत आयुष्यमान ची व्याख्या राजा ढालेंनी चळवळीत रुजविले. सौंदर्य शास्त्राचे ते विध्यार्थी होते. त्यांची लेखन तर्क शुद्ध पद्धतीची होती. विज्ञानवादी लेखन. व्यवस्थेच्या विरोधात लढणारा मी माणूस आहे. असं ते नेहमी म्हणत असत. असं म्हणत इंदिरा आठवले यांनी ढाले यांच्या आठ्वणीं जागवल्या.

ढालेकन्या गाथा म्हणाले ” साहित्याचा झंझावात आणि आणि आंबेडकरी चळवळीला बाबाने दिलेलं योगदान विसरू शकत नाही. दलित साहित्याला दलित न म्हणता आंबेडकरी साहित्य हा विचार रुजवला तो बाबाने. मराठी साहित्याचा प्रवाह ज्यांनी बदलला, परिभाषा बदलली ती बाबाने. पूस्तकांवरचे प्रेम बाबांचं कधीच हटलं नाही. आमच्या इमारतीचे कंट्रक्शन सुरु असताना आमची बिल्डिंग हलवली तेंव्हा बाबांना खुप त्रास झाला.

दीक्षा ढाले म्हणाले ” शेवटच्या काळात त्याचा लोकांनी वापर केला. स्मृतीभ्रश झाला होता.मेंदू चा जेव्हा स्कॅन केला तेंव्हा ताणामुळे स्मृती विषयी अडथळे निर्माण होत होते. मराठी साहित्य आणि आंबेडकरी चळवळीत अनेक शब्द त्यांनी दिले.

अविनाश महातेकर म्हणाले ” रामदास आठवले यांनी ढाले यांच्यातील दरी दूर झाली. आठवलेंनी जी भूमिका घेतली जेष्ठ नेत्याच्या आठ्वणीं जिवन्त ठेवण्याच्या यत्न त्यांनी केला. आंबेडकरी चळवळीत ढालेंनी निष्ठेने भूमिका निभावली. रिपब्लिकन पक्ष सुरुवातीच्या
आठ दहा वर्षात पक्ष खीळखिळा झाला होता. महाराष्ट्रातील अनेक आंबेडकरी तरुणाना युक्रांद आणि अशा अनेक संघटनांचे दरवाजे उघडे होते. अनेक संघटना उगड्या होत्या त्या काळात आंबेडकरी साहित्याचा प्रसार त्यांनी केला. कालकथित ,मंगल परिणय वापरात आणला तो ढाले यांनीच आणला.

कार्यक्रमाचा समारोप खुद्द रामदास आठवले यांच्या भाषणाने झाला तर मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार आयोजक परशुराम वाडेकर यांनी मानले.

Leave a Comment