Tuesday, January 7, 2025

Hadzabe Tribe : बापरे!! ‘या’ जमातीचे लोक खातात कवटी; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hadzabe Tribe) संपूर्ण जगभरात विविध जमातींच्या लोकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची लोकप्रियता आहे. यामध्ये अनेक विचित्र परंपरा आणि विचित्र खानपानाचा सुद्धा समावेश आहे. काही जमाती अशाही आहेत ज्यांच्या राहणीमानाची सामान्य माणसाला भीती वाटू शकते. विचित्र काड्या पदार्थांविषयी बोलायचे झाले तर सगळ्यात आधी चीनचा उल्लेख होतो. मात्र आज आपण अशा एका जमातीविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचं खाणं नुसतं विचित्र नाही तर क्षणभर अंगावर काटा आणणारं आहे.

जगभरातील विविध जमातींमध्ये काही जमातीचे लोक असे आहेत जे सुंदर दिसण्यासाठी माणसाच्या हाडाचे अलंकार परिधान करतात. तर काही लोक आपल्याच नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून आपली भूक भागवतात. (Hadzabe Tribe) हे लोक संपूर्ण जगातील अत्यंत विचित्र खाद्य खातात. यांपैकी एका जमातीविषयी आपण बोलत आहोत जी चक्क माकडाची कवटी शिजवून खाते.

हे ऐकून विश्वास बसणं अवघड आहे पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईल की हे वास्तव आहे.

पृथ्वीवरील शेवटची शिकारी जमात (Hadzabe Tribe)

सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, जी व्यक्ती चक्क माकडाची कवटी शिजवताना आणि खाताना दिसत आहे ती हदजाबे जमातीची आहे. हदजाबे जमातीचे लोक हे मुळ तंजानियात वास्तव्यास आहेत. त्यांची लोकसंख्या फारशी नाहीये. या जमातीचे मोजून १२०० ते १५०० लोक हयात आहेत. या जमातीच्या लोकांना पृथ्वीवरील शेवटच्या उरलेल्या शिकारी जमातींपैकी एक म्हटले जाते. विचित्र खानपान करणारे हे लोक मनमिळाऊ स्वभावाचे असतात, असे म्हटले जाते.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर hadzabe_tradition नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ४ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर, ७ लाख ८५ हजारांहून अधिक लोकांनी यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओत दिसणारी हदजाबे जमातीची ही व्यक्ती मोठ्या आवडीने माकडाची कवटी खाताना दिसत आहे. जे पाहून तुम्हाला किळस वाटू शकते. मात्र अनेक नेटकऱ्यांनी याबाबत कुतूहल व्यक्त केले आहे. (Hadzabe Tribe)