हफीज सईदच्या अटकेवर उज्वल निकम म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफीज सईदला आज पाकिस्तान मध्ये अटक झाली आहे. यावर जेष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आपले मत व्यक्त केले आहे. हफीज सईदला अटक करणे हे पाकिस्तानचे ढोंग असू शकते त्यामुळे भारताने सावध राहण्याची गरज आहे असे उज्वल निकम म्हणाले आहेत.

 

भारताने आंतरराष्ट्रीय स्थरावर जे पुरावे सादर केले. त्याच प्रमाणे भारताने आपल्या कूटनीतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या विरोधात जे वातावरण निर्माण केले आहे त्या जोरावर पाकिस्तानवर दबाव वाढला. त्यातूनच हफीज सईदला अटक करण्यात आले आहे. मात्र त्याच्या विरोधात पाकिस्तान न्यायालयात कोणते पुरावे सादर करते आणि त्याला काय शिक्षा होते हे पाहण्यासारखे राहणार आहे. अन्यथा हे पाकिस्तानचे ढोगआहे असेच म्हणावे लागेल असे उज्वल निकम म्हणाले आहेत.

दरम्यान भारताने हाफिज सईदच्या अटकेसाठी टाकलेल्या दबावातूनच त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी हे मोठे यश असल्याचे मानले जाते आहे. त्याच प्रमाणे हाफिजच्या १२ निकटवर्तीयांच्या विरोधात समाजसेवेच्या नावावर पैसे गोळाकरून तो पैसा दहशतवादी कारवाह्या करण्यासाठी वापरत असल्याच्या कारणावरून अटक करण्याची कारवाही करण्यात आली होती. त्यानंतर हाफ़ीजला देखील याच प्रकरणात अटक झाली असावी असे बोलले जाते आहे.