हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माईर्स एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठ पुणे तर्फे काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर येथे 9 व्या विज्ञान, धर्म,अध्यात्म व तत्वज्ञान या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीं प्रधानमंत्री मोदींच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉर मधून भारताचा भारत विश्र्वगुरू या संकल्पनेचा जोरदार उद्घोष करण्यात आला.
या परिषदेचं उद्घाटन डॉ. करणंसिंग यांच्या हस्ते झालं तर इंद्रेश कुमार,प्रमोद कुमार, योगी अमरनाथ,अविनाश धर्माधिकारी,भूषण पटवर्धन, ए. एस.किरण कुमार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी एक 10 सत्रात आयोजीत या परिषदेत अनेक मान्यवरांचे विद्वत्ता प्रचुर विचार ऐकायला मिळाले.तसेच या जागतिक परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, दि. 10 फेब्रुवारी रोजी पार पडलेला, सर्व धर्मीय शुभाशिर्वाद सोहळा होय! ज्यामध्ये जगातील सर्व धर्मग्रंथ हे खऱ्या अर्थाने जीवनग्रंथ आहेत, या तत्त्वावर आधारित जगातील विविध धर्मांचे पवित्र भगवद्गीता, पवित्र, कुराण, पवित्र बायबल, पवित्र त्रिपिटक, पवित्र गुरु ग्रंथसाहब, पवित्र तोराह यांचे त्या त्या धर्मातील मानवकल्याणाविषयीचे मुलभूत तत्त्वज्ञान थोडक्यात उपस्थितांसमोर मांडण्यात आले.
प्रत्येक धर्माची उपासनापद्धती जरी वेगळी असली, तरी सर्व धर्मांमध्ये प्रेम, करुणा, दया, त्याग, समर्पण याचीच शिकवण दिली जाते. मग ते गौतम बुद्धांचे पंचशील असो, इस्लामचा शांतींचा संदेश असो, संत ज्ञानदेवांचे पसायदान असो वा गुरुग्रंथसाहिबांतील शिकवण असो, या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये भारतातील विविध धर्मिय, विविध पंथीय सहभागी झाले. या ऐतिहासिक स्वरूपाच्या शुभाशिर्वाद सोहळ्याची फलश्रुती म्हणजे एकं सत् विप्रा बहुधा वदंती’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारांची एकवाक्यता होय ! अशा प्रकारचा सर्व धर्मियांचा ऐतिहासिक सोहळा श्री काशी विद्यनाथ कॉरिडॉरमध्ये प्रथमच पार पडला.