हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक स्त्रीला लांबलचक, काळेभोर आणि घनदाट केस आवडतात. परंतु आजकाल केस गळतीची समस्या खूप महिलांना झालेली आहे. केस एकदा गळायला लागले (Hair Fall) की ते थांबतच नाहीत. मग केसांना कितीही शाम्पू किंवा तेल लावले, तरी तेवढ्यापुरता परिणाम दिसून येतो. परंतु पुन्हा एकदा मग केस गळतील सुरुवात होते.
अनेकवेळा स्त्रिया या मेडिकलमधील अनेक प्रॉडक्ट वापरतात. तरी देखील त्यांच्या केसांवर काहीच परिणाम होत नाही. तुम्हाला जर केस गळती (Hair Fall) थांबवायची असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय केले पाहिजे. यासाठी तुम्हाला कसलाही खर्च येणार नाही. त्याचप्रमाणे या उपायांचे तुम्हाला काही साईड इफेक्ट देखील जाणवणार नाहीत. आता ही केस गळती थांबवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी फायदेशीर आहे, त्या जाणून घेणार आहोत. तुम्ही जर नैसर्गिक पद्धतीने केस गळतीवर उपाय केला, तर 15 दिवसात तुमच्या केसांची वाढ देखील चांगली होईल.
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय कोणता?
घरच्या घरी हेअर टोनर करण्यासाठी तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यात कडीपत्ता, ताज्या एलोवेराची पानं कापून घ्या. आणि एका भांड्यात मिक्सरच्या घालून मिक्स बारीक करून घ्या. त्यात कांद्याचे काही काप घाला तसेच त्यात एलोवेरा जेल आणि विटामिन सीच्या कॅप्सूल घाला. आणि त्या मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर हे सगळे मिक्सचर एका बारीक कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या.
आता तयार झालेले हे मिक्सचर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून टोनर स्वरूपात केसांवर स्प्रे करू शकता यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होईल आणि केस गळती देखील होणार नाही. तुम्ही जर मेडिकलमधील सगळे औषधे वापरून कंटाळले असाल. आणि तरी देखील तुमच्या हेअर फॉलवर काहीच परिणाम होत नसेल, तर तुम्ही घरगुती पद्धतीचा हा हेअर टोनर नक्की युज करू शकता. याने तुमच्या केसांना चांगला थिकनेस येईल आणि केस गळती थांबून नवीन केस देखील वाढतील.