Hamare Baarah : कर्नाटकात ‘हमारे बारह’ सिनेमावर बंदी; काँग्रेस सरकारला वाटतेय ‘दंगली’ भडकण्याची भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hamare Baarah) गेल्या काही महिन्यांपासून ‘हमारे बारह’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक अत्यंत वेगळे, आक्रमक आणि लक्षवेधी आहे. या सिनेमात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर मध्यवर्ती भूमिकेत असून त्याचे चाहते या सिनेमाबाबत उत्सुक आहेत. असे असताना नुकतीच कर्नाटक राज्यात ‘हमारे बारह’ या सिनेमावर बंदी घालण्यात आल्याचे समोर आले आहे. या सिनेमावर काँग्रेस सरकारकडून बंदी घालण्यात आली असून याबाबत बोलताना सरकारने एक भीती व्यक्त केली आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

का घातली बंदी? (Hamare Baarah)

‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बंदी घातली आहे. याबाबत सांगताना सरकारने हा सिनेमा सांप्रदायिक तणाव वाढवू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने पुढील २ आठवड्यापर्यंत या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्याचे समोर आले आहे. हा सिनेमा प्रदर्शित करायचा असेल तर त्यासाठी आधी चर्चा करावी लागेल, असेही सरकारने म्हटले आहे.

कर्नाटक सिनेमा (नियमन) कायदा, १९६४ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही अल्पसंख्याक संघटनांनी आणि शिष्टमंडळांनीसुद्धा या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याबाबत आक्षेप नोंदविला होता. (Hamare Baarah) दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. मात्र, रिलीजच्या दोन दिवस आधीच ही बंदी मागे घेतली गेली.

अन्नू कपूर यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

‘हमारे बारह’ या सिनेमावर आक्षेप घेतल्यानंतर सिनेमातील मुख्य कलाकार अभिनेते अन्नू कपूर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. (Hamare Baarah) दिनांक ३ जून २०२४ रोजी त्यांनी शिंदेंची भेट घेतली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना सांगितले, ‘आमचा आगामी सिनेमा ”हमारे बारह”वरून वाद निर्माण झाला असून काही लोकांनी आमच्या दिग्दर्शक व निर्मात्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आम्हा कलाकारांनाही धमकी मिळाली आहे.

आमचे निर्माते कमल चंद्रा, निर्माते रवी गुप्ता आणि इतर निर्मात्यांना शिरच्छेद करण्याची धमकी मिळाली आहे. आमचा हा चित्रपट ७ जून रोजी संपूर्ण देशात आणि इतर १५ देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे’.

Hamare Baarah – Official Teaser 1 | Annu Kapoor | Parth Samthan

कथानकात आहे तरी काय?

या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर समजतंय की, ‘अभिनेते अन्नू कपूर यांनी हमारे बारह चित्रपटात मन्सूर अली खान नावाचे पात्र साकारले आहे. या पात्राची पहिली पत्नी बाळंतपणातच दगावते. (Hamare Baarah) तर दुसरी पत्नी सहाव्यांदा गर्भवती असताना डॉक्टर तिचा जीव जाऊ शकतो असे सांगतात. अशावेळी, मन्सूर मात्र पत्नीचा गर्भपात करण्यास स्पष्ट नकार देतात. यामुळे पहिल्या पत्नीची मोठी मुलगी आपल्या सावत्र आईला वाचविण्यासाठी मन्सूरला कोर्टात ओढते.

यानंतर कोर्टात तिच्या सावत्र आईच्या गर्भपातासाठी मंजूरी मिळावी म्हणून खटला दाखल केला जातो. या केसच्या सुनावणीभोवती या सिनेमाचे कथानक फिरते. एकंदरच काय तर हा सिनेमा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करतो आहे. (Hamare Baarah) मात्र, समाजातून याकडे धर्मावर टीका केल्याचे पाहिले जात असल्याने वाद निर्माण झाला आहे.