औरंगाबाद: न्यायालयाच्या आदेशानुसार बीड बायपास रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या सात मालमत्तांवर शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने हातोडा टाकला. या कारवाईस प्रारंभी विरोध झाला. मात्र नंतर सर्व मालमत्ता पाडण्यात आल्या
सकाळी महानुभाव आश्रम चौकापासून कारवाईला सुरुवात झाली. दिवसभरात सात मालमत्तावर मनपाने बुलडोझर फिरवला. बीडबायपास रुंदीकरण करत असताना दोन वर्षांपूर्वी मनपा विरुद्ध 23 मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बुधवारी व गुरुवारी अतिक्रमण हटाव विभागातर्फे मार्किंग करत मालमत्ताधारकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले गेले.
त्यानंतर शुक्रवारी महानुभव आश्रमापासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव ची कारवाई सुरू झाली. सायंकाळपर्यंत सात मालमत्तांचे अतिक्रमण हटविण्यात आले. पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे,आर. एस. पवार, वसंत भोये, नगररचना शाखा अभियंता संजय चामले, संजय कपाळे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद यांनी ही कारवाई केली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group