स्वयंरोजगारासाठी दिव्यांग तरुण धडकला थेट अधिकाऱ्यांच्या दारात  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अचलपूर नगरपालिकेमध्ये आज एक दिव्यांग व्यक्तीने नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या कक्षात धडक देत रोजगाराची विचारपूस केली. या दिव्यांग व्यक्तीची स्वयंरोजगारासाठीची धडपड पाहता संबंधित अधिकाऱ्याने या व्यक्तीला मदतीचे आश्वासन दिले आहे. मो.  ईमरान असे या दिव्यांग तरुणाचे नाव आहे.

याबाबतच्या सविस्तर माहितीनुसार अचलपूर नगरपालिकेमध्ये आज सकाळी ११ वाजता दिव्यांग मो. ईमरान नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कक्षेच्या दिशेने बघत होता. मात्र पायाने दिव्यांग असल्यामुळे तो अधिकाऱ्यांच्या कक्षेपर्यंत पोहोचू शकत नव्हता. दिव्यांग व्यक्ती आपली प्रतीक्षा करत आहे याची जाणीव होताच दोन्ही अधिकारी दिव्यांगाजवळ त्याची विचारपूस करण्याकरिता आले. त्यावेळी ईमरानने स्वयंरोजगारासाठी मदत करण्याची विनंती या अधिकाऱ्यांकडे केली. आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी ईमरानने किमान एक पाच बाय पाच टिनाचे शेड असलेल्या टिनाचा खोका मिळविण्यासाठी मदतीची इच्छा प्रकट केली.

दिव्यांग ईमरानची रोजगारासाठीची स्वाभिमानी धडपड पाहता अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या दिव्यांगांसाठी काही नगरपालिके अंतर्गत तरतुदी आहेत का ? याची तपासणी करून तुम्हाला कळवतो असे सांगितलं. तसेच मुद्रा योजनेचा लाभ घ्या. नगरपालिका आपल्याला त्यामधून सबसिडी देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यावर नगरपालिकेमध्ये आलेला दिव्यांग काहीसा खूश झालेला दिसला. मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिव्यांगांची असलेली ही धडपड तरुणांनाही लाजवणारी आहे. म्हणतात ना ईच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो अशीच ही म्हण आता पूर्णत्वास होताना दिसत आहे.

Leave a Comment