महाशिवरात्रीला घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यात ‘हर हर महादेव’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात मार्च 2020 पासून गाभाऱ्यात जाऊन भक्तांना दर्शन घेणे बंद आहे. महाशिवरात्रिपासून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मंदिरे बंद होती.
त्यानंतर मंदिरे खुली करण्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकारण तापले. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला सर्व मंदिरे खुली झाली. मात्र, घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यात दर्शन घेणे सध्या बंद आहे.

श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने भक्तांना दर्शनासाठी गाभारा खुला करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मागेच निवेदन दिले. लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पाहून पाच ते दहा भाविकांना गाभाऱ्यात सोडावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे ट्रस्टला बंधनकारक करण्यात आले आहे.