हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (PBKS vs CSK IPL match )संघ अडचणीत असतानाही महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) चक्क ९ व्या क्रमांकावर बॅटिंगला आल्याने माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) संताप व्यक्त केला आहे. धोनीला जर ९ व्या क्रमांकावर खेळायचं असेल तर त्याने त्यापेक्षा खेळूच नये, त्याच्या ऐवजी चेन्नईने अतिरिक्त गोलंदाज खेळवावा असा सल्ला हरभजनने दिला आहे. फलंदाजीला न आल्याने संघाला निराश केले आहे. असेही भज्जी म्हणाला तर तर दुसरीकडे इरफान पठाणने सुद्धा धोनीवर निशाणा साधला आहे. धोनीने किमान चार-पाच षटके फलंदाजी करावी असं इरफान पठाण म्हणाला.
हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला??
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना भज्जी म्हणाला, ‘जर MS धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर त्याने खेळू नये. त्याच्या जागी संघाने वेगवान गोलंदाजाची निवड केल्यास बरे होईल. तो निर्णय घेणारा आहे आणि त्याने फलंदाजीला न आल्याने संघाला निराश केले आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या आधी शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला, मात्र तो कधीही धोनीसारखे फटके मारू शकत नाही. धोनीने ही चूक का केली हे मला समजत नाही. त्यांच्या परवानगीशिवाय काहीही होत नाही. त्याला फलंदाजीला उतरवण्याचा निर्णय दुसऱ्याने घेतला हे मी मानायला तयार नाही. पंजाब विरुद्ध चेन्नईला जलद धावा काढण्याची गरज होती, असं असताना महत्वाच्या सामन्यात धोनी लवकर फलंदाजीला आला नाही हे धक्कादायक होते.
इरफान पठाणने सुद्धा धोनीवर निशाणा साधला-
दुसरीकडे इरफान पठाणने सुद्धा धोनीवर निशाणा साधला. ‘एमएस धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजी आल्याने चेन्नईला कोणताही फायदा होणार नाही. मला माहित आहे की तो 42 वर्षांचा आहे, पण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. धोनीने कमीत कमी किमान चार-पाच षटके फलंदाजी करावी. तो शेवटच्या षटकात किंवा शेवटच्या दोन षटकांमध्ये फलंदाजी करतो. आणि हे CSK साठी चालणार नाही. इथे जेव्हा संघाला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही शार्दुलला तुमच्या अगोदर फलंदाजीला पाठवू शकत नाही. धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तुम्ही पाहू शकत नाही असं इरफान पठाणने म्हंटल.