हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज निधन झाले आहे. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे. हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक माहितीत कळत आहे. कृणाल सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत आहे आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरात परतला. आता तो स्पर्धेत पुढील सामन्यात खेळणार नाही.
बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआयशी बोलताना शिशिर हटंगडी म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या दुखात सहभागी आहोत.
हार्दिक आणि कृणाल या दोघांनाही क्रिकेटपटू बनवण्यात हिमांषू यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक त्याग करून या दोघांनाही यशस्वी क्रिकेटपटू बनवले. काही दिवसांपूर्वी MI TVसोबत या दोघांबाबत बोलताना हिमांशू भावूक झाले होते. ते म्हणाले,”हार्दिक व कृणाल विषयी बोलताना मला अश्रू अनावर होत नाहीत. आम्ही त्यांना लहानवयापासूनच क्रिकेट खेळू दिले. आमच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आणि नातेवाईकांनी टीकाही केली. पण, आम्ही आमच्या निर्धारावर ठाम राहीलो आणि या दोघांनी जे यश मिळवलंय, ते पाहून अभिमान वाटतो.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’