टिळक वर्मावर पराभवाचे खापर फोडून हार्दिकने स्वतःची इज्जत आणखी घालवली??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली कपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अवघ्या १० धावांनी पराभव झाला. दिल्लीच्या 257 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ २४७ पर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात डावखुरा फलंदाज टिळक वर्माने 32 चेंडूत 63 धावांची खेळी करत मुंबईच्या आशा शेवट्पर्यंत जिवंत ठेवल्या होत्या. मात्र तरीही सामना संपल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) मुंबईच्या पराभवाला अप्रत्यक्षरित्या टिळक वर्माला (Tilak Verma) जबाबदार ठरवत स्वतःची इज्जत आणखी कमी केली असंच म्हणायला हवं…

खरं तर रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार केल्यापासून तो चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. हार्दिकचा फॉर्म सुद्धा खराब आहे. जसप्रीत बुमराहला सुरुवातीला ओव्हर न देणे, प्लेयिंग ११ मध्ये सातत्याने बदल करणे, स्वतःच्या फलंदाजी क्रमात बदल करणे, गोलंदाजांचा नीट उपयोग न करणे हि मुंबईच्या पराभवाची प्रमुख कारणे आहेत. मात्र ज्या टिळक वर्माने 32 चेंडूत 63 धावांची खेळी केली त्याच्यावरच हार्दिकने निशाणा साधला. अक्षर पटेल जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा डाव्या हाताच्या फलंदाजाने त्याच्यावर हल्ला करायला हवा होता असं म्हणत हार्दिकने टिळक वर्मावर पराभवाचे खापर फोडलं. पण नेमकी परिस्थिती काय होती? टिळकने अक्षर विरुद्ध किती धावा काढल्या याचे विश्लेषण करूया…

अक्षर पटेलने टिळक वर्माला सहा चेंडू टाकले ज्यात त्याने १४ धावा केल्या. मुंबई इंडियन्सची अवस्था 3 बाद 72 धावा असताना अक्षर पटेल टिळक विरुद्ध गोलंदाजी करत होता. संघ अडचणीत असताना हार्दिक आणि टिळक पिचवर होते तेव्हा टिळकने अक्षरच्या चार चेंडूत चार धावा केल्या. परंतु एकदा पार्टनरशिप बसल्यानंतर टिळक वर्माने अक्षरला षटकार आणि चौकार मारला. तरीही जर टिळकने अक्षर वर आणखी अटॅक करावा असं हार्दिकला वाटतं होते तर त्यावेळी मैदानावर असतानाच त्याने का सांगितलं नाही असाही प्रश्न निर्माण होतोय. याउलट स्वतः गोलंदाजी करताना 2 षटकात 41 धावा देणं आणि फॉर्ममध्ये असलेल्या टीम डेव्हिडला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे असे हार्दिक पांड्याचे निर्णयच मुंबईसाठी धोकादायक ठरतायत.