हार्दिक पटेलचा बालमैत्रिणीशी प्रेमविवाह

Hardik Patel Wedding
Hardik Patel Wedding
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद प्रतिनिधी | गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आज (27 जानेवारी) विवाहबंधनात अडकले. हार्दिक यांनी त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी लग्नगाठ बांधली. पटेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दीक पटेल याने गुजरातमध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर तो देशभर प्रसिद्ध झाला होता.

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावातील एका मंदिरात हा विवाहसोहळा काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाह सोहळ्याला वधु-वर कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी अशा काही महत्त्वाच्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आले होते.

किंजल ही मूळ वीरमगास येथील रहिवासी आहे, पण आता त्यांचं कुटुंब सुरतला वास्तव्यास आहे. हार्दिक देखील मूळ वीरमगास येथील चंदन नगरी या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. किंजल ही हार्दिकची बहीण मोनिका हिच्यासोबत शाळेत होती. ती वरचेवर हार्दिकच्या घरी यायची. तिथंच तिची हार्दिकशी ओळख झाली. कालांतरानं या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. किंजल ही कॉमर्स शाखेची पदवीधर असून सध्या गांधीनगरमधील एका लॉ कॉलेजातून एलएलबी करत आहे.

इतर महत्वाचे –

रितेश देशमुख १० वर्ष जेनेलीयाला डेट करत होता, जाणून घ्या लव्हस्टोरी

प्रियांका चोप्राला मोह पाडणारा निक जोनस नक्की कोण आहे ? जाणुन घ्याच

साइना नेहवाल करणार या खेळाडू सोबत लग्न