नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
दिंडोरीमधून भारती पवार यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झाले असून त्यांच्या समर्थकानी येत्या शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात हरिश्चंद्र चव्हाण यांची पुढील भुमीका काय असणार आहे यावर विचारविपर्श होणार असून आगामी लोकसभेत चव्हाण बंडखोरी करणार असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण यांणी अपक्ष निवडणुक लढवल्यास भारती पवार यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.
युतीच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे मेळाव्यात हजर राहतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते, पण ते या मेळाव्यास अनुपस्थित राहिले. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांची पुढील भूमिका काय असणार आहे याचे चित्र येत्या शुकवारी होणाऱ्या मेळाव्यात स्पष्ट होणार असून ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना उमेदवारी देताच राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष असलेल्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपच्यावतीने उमेदवारी देण्यात आल्याने त्यानंतर त्यांच्या प्रचारार्थ पहिलाच मेळावा पालकमंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झाले असून त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली.
हे पण वाचा –
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राजकीय भुंकप होण्याची शक्यता
नाशिक राष्ट्रवादीत फुट पडण्याची चिन्हे, हे आहे कारण…
सोशली उतावीळ बहाद्दरांचा बंदोबस्त करणार – विश्वास नांगरे पाटील
काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले!
सांगलीच्या जागेवरून जयसिंगपूर मध्ये नेत्यांचे खलबते, स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना आॅफर