भारताच्या हरलीन देओलचा जबरदस्त कॅच; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि इंग्लंड महिला संघातील पहिला T-20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी भारताची अष्टपैलू खेळाडू हरलीन देओल हिच्या जबरदस्त कॅचने सर्वांची मने जिंकली. हरलीनने सीमारेषेवर पडकलेला हा झेल अनेक वर्षे क्रिकेटप्रेमींच्या मनात राहील.

इंग्लंडच्या डावाच्या 19 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर इंग्लंडच्या अॅमी जोन्स ने जोरदार फटका मारला. त्यावेळी बाउंड्री लाईनवर हरलिन फिल्डिंग करत होती. बॉलचा अंदाज घेऊन तिने कॅच पकडण्याचा निश्चय केला. बॉल सीमारेषेपार जाणार हे ठरलं होतं… परंतु हरलीनने हवेत सूर मारत पहिल्यांदा बॉलवर ताबा मिळवला. पण आपण सीमारेषेबाहेर आहोत, हे कळताच तिने हवेतूनच बॉलला सीमारेषेच्या आत टाकलं आणि पुन्हा सूर  मारत जबरदस्त कॅच घेतला.

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट गमावून 177 धावा केल्या. परंतु पावसाने व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 8.4 ओव्हरमध्ये 73 धावांचा टप्पा पार करावा लागणार होता. परंतु निर्धारित षटकांमध्ये भारताने तीन विकेट्स गमावून 54 धावा केल्या. या सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला.

Leave a Comment