थोडा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 869 पाॅझिटीव्ह तर 879 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 869 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 879 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 12 हजार 311 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7. 6 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 303 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 2 हजार 535 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 88 हजार 51 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 868 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 33 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गुरूवारपर्यंत मृत्यू झालेल्या आज रुग्णांची संख्या 

जावली – 183, कराड – 906, खंडाळा – 154, खटाव – 475, कोरेगांव – 383, माण – 284, महाबळेश्वर – 84, पाटण – 301, फलटण – 477, सातारा – 1246, वाई – 304 व इतर – 71, असे गुरूवार 8 जुलै अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 868 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे

Leave a Comment