परदेशात शिक्षण घेऊन भारतात आला, आता ‘या’ फळाची शेती करुन कमावतोय लाखो..1200 रु किलो ने विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली नोकरी करण्यापेक्षा एखादा स्वतंत्रपणे व्यवसाय केल्यास त्यामध्ये चांगले पैसे कमावता येऊ शकतात. खास करून शेती क्षेत्रात व्यवसाय केल्यास असे खूप पर्याय आहेत. असाच एक पर्याय परदेशात शिक्षण घेऊन भारतातील भोपाळ येथील राहणाऱ्या हर्षित गोधा या उच्चशिक्षित युवकाने निवडला. त्याने इज्राइल येथील एवोकॅडो नावाच्या फळाची शेती केली. त्याची रोपे तयार करून त्यातून तो आज लाखो रुपये कमवू लागला आहे.

भोपाळ येथील राहणाऱ्या हर्षितने बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर युकेला जाण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी त्याने बीबीएचे शिक्षणही घेतले. त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना तो त्या ठिकाणी दररोज एवोकॅडो नावाचे फळ खात असता. ते खाता खाता त्याचे लक्ष त्या फळाच्या पॅकेटवर गेले. त्याने ते पहिले असता त्याच्या लक्षात आले की, आपण खत असलेले फळ तर इजराइलहून येत आहे.

तेव्हा त्याला त्या फळाबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली. मग त्याने विषारी केला कि जर इजराइल सारख्या ठिकाणी उकाड्यासारख्या परिस्थितीत ‘एवोकॅडो’ची शेती केली जाऊ शकते तर मग आपल्या भारतात का केली जाऊ शकत नाही? कालांतराने परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर मायदेशी भोपाळला परतलेल्या हर्षितने स्वतःशेती करण्याचा निर्णय घेतला.

एवोकॅडो शेतीबद्दल नियोजन करत असताना हर्षित लं डन येथे इंटर्नशिप करत होता. तेव्हा त्याने इजराइल या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी एवोकाडोची शेती करणाऱ्या शेतकऱ्याची भेट घेतली. तसेच त्याच्याशी चर्चा करत या फळाबाबत व शेतीबाबत पूर्ण माहिती घेतली. हर्षितने परदेशातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर भोपाळला 2019 मध्ये परतताच ‘एवोकॅडो’ची शेती करण्याचा निर्णय घेतला.

हर्षित ने इजराइलवरून सोबत आणलेले ‘एवोकॅडो’ची रोपे जुलै 2021 मध्ये पुन्हा वाढवण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने नर्सरीचीही निर्मिती केली. त्याने हळू हळू ‘एवोकॅडो’ची रोपे वाढवण्यास सुरुवात केली. हर्षित वाढवत असलेल्या ‘एवोकॅडो’ या फळाच्या एका रोपाची झाडाची किंमत हि 3 हजार रुपये इतकी आहे. एका एकरमध्ये जवळपास 170 रोपे तयार केली जाऊ शकतात. हर्षित आता सुमारे पाच एकरात रोपे लावलेली आहेत. हर्षितच्या या एवोकॅडोच्या रोपांना परदेशातही जास्त मागणी आहे.

अशा प्रकारे करतात ‘एवोकॅडो’ची लागवड – 

एवोकॅडो या फळपिकाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. या कलम पद्धतीने किंवा बियाणे खोपून त्याची लागवड केली जाते. कलमी रोपाची लागवड केलेल्या झाडाची उंची साधारणत: 25 फुटापर्यंत वाढते आणि 3 वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते. तर बी खोपून लागवड केलेल्या झाडाची उंची 50 फुटापर्यंत वाढते आणि पाच ते सात वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते. अर्थात प्रत्यक्ष उत्पन्न सुरू होण्यापूर्वी सुरुवातीची काही वर्षे या झाडांमध्ये आंतरपीकदेखील घेता येते.

25 ते 50 वर्षे काळापर्यंत उत्पन्नाची हमी –

एवोकॅडो या लागवड केलेल्या झाडापासून 25 ते 50 वर्षे अशा मोठ्या काळापर्यंत उत्पन्नाची हमी असते. आजच्या घडीला देशात प्रामुख्याने आयात केलेल्या ‘एवोकॅडो’ फळांची विक्री होत असून काही प्रमाणात भारतात उत्पादित फळेही उपलब्ध होत आहेत.

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी होते ‘एवोकॅडो’ची लागवड

‘एवोकॅडो’ या नावाने ओळख असलेल्या फळपीकास किमान 15 ते कमाल 40 अंश सेल्सियस तापमान अनुकूल असते. त्यामुळे कोकणासह राज्यातील बहुतांश भागात या फळपिकाची शेती केली जाऊ शकते. तसेच वाढती मागणी आणि चढ्या दरामुळे या फळापासून चांगले उत्पन्न मिळून ही शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.

Leave a Comment