खासदार इम्तियाज जलील यांच्या मोर्चाला हर्षवर्धन जाधव यांचा पाठिंबा

औरंगाबाद । लॉकडाऊन विरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी पैठणगेट येथून उद्या (दि. 31 मार्च) दुपारी तीन वाजता भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याची घोषणा काल पत्रकार परिषदेत केली. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव जनसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी खासदारांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल करुन रायभान जाधव विकास आघाडीचे कार्यकर्ते व स्वतः मोर्चात सहभागी राहणार असल्याचे म्हटले आहे.

एकीकडे मोठे उद्योग सुरु ठेवत, विमान कंपन्या नियमाचे पालन न करता आपला व्यवसाय करत आहे. दुसरीकडे छोटे उद्योग, हॉटेल, ठेलेवाले, ऑटोचालक, कामगार, पानटपरी, फळ विक्रेते यांचे उद्योग लॉकडाऊनमध्ये बंद करुन गरीबांचे हाल करत आहे. अगोदरच कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

जनसामान्यांच्या हक्कासाठी कोणी लढत असेल, तर जातीभेद विसरून साथ देण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. सर्व जाती धर्माचे लोकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like