‘या’ मतदारसंघात निवडून येण्यासाठी अपक्षच असावं लागतं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्रा बरोबरच हरियाणा राज्याचे विधानसभा काल जाहीर झाले. निवडणुकांचे जाहीर प्रत्येक निकालात आश्चर्यकारक असे काही निकाल लागत असतात. हरियाणात असाच एक मतदारसंघ आहे पंडुरी जेथे कायम अपक्ष उमेदवार निवडून येतो. पंडुरी विधानसभा मतदारसंघ हरियाणातील कैथल जिल्ह्यातंर्गत येतो.

गेल्या २३ वर्षांपासून या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या ही निवडणुकीत परंपरा कायम ठेवत पुन्हा एकादा अपक्ष उमेदवार या जागी निवडून आला आहे. १९९६ सालापासून पंडुरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून येणाची जणू काही प्रथाच पडली आहे. तेव्हा अनपेक्षितपणे हा मतदारसंघ अपक्ष उमेदवारासाठी राखीव असल्याचे गमतीने म्हटलं जात आहे.

यापूर्वी पडुंरी विधानसभा क्षेत्र हे कुरुक्षेत्राचा भाग होता. या मतदारसंघातून 1967 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या आर. पी. सिंह हे विधानसभा निवडणूक जिंकत आमदार झाले होते. त्यानंतर 1991 मध्ये काँग्रेसचे उमेदवार ईश्वर यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. हरियाणातील 90 मतदारसंघासाठी विधानसभा निवडणूक पार पडली. यात भाजपला 40, तर कांग्रेसला 7 जागांवर विजय मिळाला. तर हरियाणा लोकहित पक्ष 1, अपक्ष 7, भारतीय राष्ट्रीय लोकदल 1, जननायक जनता पक्ष 10 जागांवर विजय मिळवला.