आदित्य ठाकरेंच्या राजतिलकाची शिवसेनेने केली तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । गुरुवारी राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालात मतदार राजाने कुठल्याच एका पक्षाला बहुमत दिले नसल्याचे पाहायला मिळतय. एक हाती सत्ता स्थापनक करणाऱ्या भाजपला जनतेने चांगलाच धडा शिकवलाय. भाजप सेनेचे युती असल्याने ते एकत्र येत सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता आहे. परंतु आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो मुख्यमंत्री कोण होणार. या बद्दल काही निर्णय होण्याचं आधीच वारली मतदार संघातील कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री असणार अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

तर जागावाटपात शिवसेनेला असमाधानी ठेवलेल्या भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशिवाय गत्यंतर नसल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आता ५०- ५० चा फॉर्मुला असणार असे वक्तव्य केल्याने काही नवीन राजकीय गणितं आखली जाणार असल्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येतीय.

दरम्यान ठाकरे घराण्यातील पहिलाच उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष वरळीतील निकालाकडे लागले होते. आदित्य ठाकरे यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण शिवसेना कामाला लागली होती

Leave a Comment