चंदीगढ । स्वदेशी कंपनी ‘भारत बायोटेक’च्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
भारत बायोटेकचे स्पष्टीकरण
लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यावर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यासंदर्भात भारत बायोटेकने एक निवेदन जारी केले आहे. यात, कोव्हॅक्सिनच्या 2 ट्रायलचे शेड्यूल आहे. दोन डोस 28 दिवसांत द्यायचे आहेत. दुसरा डोस 14 दिवसांनंतर द्यायचा आहे. यानंतरच याची एफिकेसी समजेल. दोन डोस दिल्यानंतरच ही लस (कोव्हॅक्सिन) प्रभाव दाखवेल, अशा पद्धतीनेच तिची निर्मिती करण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
I have been tested Corona positive. I am admitted in Civil Hospital Ambala Cantt. All those who have come in close contact to me are advised to get themselves tested for corona.
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) December 5, 2020
विज यांनी घेतला होता ‘कोवॅक्सीन’चा डोस
हरियाणामध्ये 20 नोव्हेंबर रोजी ‘कोवॅक्सीन’ या कोरोनावरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. यात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. 20 नोव्हेंबर रोजी विज यांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. विज यांच्यासोबत 200 जणांना कोव्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या ‘कोव्हॅक्सीन’ या लशीची निर्मिती केली जात आहे.
Big Breaking News
भारतातील पहिल्या कोरोना लशीसंबंधी पंतप्रधानांची खुशखबर, किंमत आणि लसीकरण प्लॅनही सांगितल
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/wTDaT62Jga#HelloMaharashtra #coronavirus #CoronaVirusUpdates #CoronavirusVaccine #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 4, 2020
संयुक्त राष्ट्राने धोकादायक यादीतून 'गांजा'ला वगळले; आता औषधांसाठी करता येईल वापर
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/yhUw2wytRI#ganja #संयुक्तराष्ट्र #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 5, 2020
भारतीय नौदलाला समुद्रात मिळणार 'रोमियो'ची साथ; 'MH-60 Romeo' हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल होणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/UEcfIVa4Il#HelloMaharashtra @WHO @IAF_MCC— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 5, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’