नवी दिल्ली । जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला असेल तर तुमच्या खात्यात रिफंडचे पैसे आले आहेत की नाही ते त्वरीत तपासा. खरं तर, नुकतेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की, 1 एप्रिल 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आतापर्यंत 2.09 कोटी करदात्यांना 1.83 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त टॅक्स रिफंड जारी केला आहे.
यामध्ये 2.07 कोटी वैयक्तिक करदात्यांना 65,938 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड आणि 2.30 लाख युनिट्ससाठी 1.17 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड समाविष्ट आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून विहित मर्यादेपेक्षा जास्त टॅक्स कापला जातो, तेव्हा तो रिफंड मिळण्यास पात्र होतो. यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे ITR दाखल करावा लागतो.
जर तुम्हालाही इन्कम टॅक्स रिफंड मिळायचा असेल तर तुम्ही त्याचे स्टेट्स ऑनलाइन पाहू शकता. ई-फायलिंग पोर्टलद्वारे किंवा NSDL च्या वेबसाइटद्वारे स्टेट्स तपासले जाऊ शकते.
सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर जा. येथे लॉगिन करा. त्यानंतर View Return/Forms वर क्लिक करा. आता इन्कम टॅक्स रिटर्न निवडा आणि मूल्यांकन वर्ष एंटर करा. आता रिफंडचे स्टेट्स कळेल. रिफंड स्टेटसची माहिती NSDL च्या वेबसाईटवरून देखील मिळू शकते.
इन्कम टॅक्स रिफंड अडकण्याच्या प्रकरणांमध्ये एक प्रमुख कारण म्हणजे बँक खात्याच्या तपशीलातील चूक. फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या खात्याचा तपशील चुकीचा टाकला असेल, तर त्यामुळे तुमचा रिफंड अडकू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर खात्याचे तपशील दुरुस्त करावे लागतील.