कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील सुपने गावात गेल्या 15 दिवसांत अचानक कोरोना बाधितांचा संख्या 47 वरती गेली आहे. कोरोनाचा कहर झाल्याने आणि बांधितांची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी तीन दिवस कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे.
कराड पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुपने गावात बेजबाबदार नागरिकांच्यामुळे कोरोना बाधितांचा कोरोनाचा कहर झाला आहे. दिवसेंन दिवस संख्या वाढत असल्याने गावातील ग्रामस्थांची डोकेदुखी वाढलेली पहायला मिळत आहे. सध्या 47 बाधितांपैकी 3 जणांना घरी सोडण्यात आले आहेत. तीन बांधितांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांवर घरीच उपचार (होम आयसोलेशन) चालू असून 7 बाधित हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत.
कोरोनाची साखळी वाढण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम कारणीभूत असल्याचे प्राथमिक माहीततून समोर आली आहे. आरोग्य यंत्रणा तसेच ग्रामपंचायत यांनी साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावात विनामास्क तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
केवळ मेडिकल आणि दवाखान्यांना परवानगी ः सरपंच अशोक झिब्रे
सुपने गावात साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गावात आरोग्य विभागाच्या सहकार्याने 45 पुढील नागरिकांचे लसीकरण चालू असून सध्या 1 हजार 600 जणांना लस देण्यात आली आहे. तीन दिवस मेडिकल व वैद्यकीय दवाखाने केवळ चार तास चालू राहतील. इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच या काळात बाहेर विनाकारण फिरणाऱ्यावर, कोरोनाचे नियम तोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सरपंच अशोक झिब्रे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा