हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संध्याकाळी Hawkins Cookers Ltd ची FD स्कीम लाँच केली जाणार आहे. या कंपनीकडून आपल्या FD वर गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला जात आहे. गेल्या वर्षीही Hawkins कडून एफडीमधील गुंतवणुकीवर हाच दर देण्यात आलेला होता. याबाबत Hawkins Cookers Ltd ने सांगितले की,” या एफडीमध्ये 13 महिने, 24 महिने आणि 36 महिने असे तीन कालावधी असतील. यामध्ये अनुक्रमे 7.5%, 7.75% आणि 8% वार्षिक व्याज दिले जाईल.
किमान 25,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार
Hawkins Cookers Ltd च्या या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 25,000 रुपये जमा करावे लागतील. तसेच यामध्ये व्याज भरण्यासाठी गुंतवणूकदारांना 2 पर्याय मिळतील. यामध्ये अर्धवार्षिक आधारावर किंवा FD कालावधीच्या शेवटी एकत्रित आधारावर व्याज देणे निवडता येईल. कम्युलेटिव्ह पर्यायामध्ये, FD कालावधीच्या शेवटी व्याज दिले जाते, जेणेकरून व्याज मासिक चक्रवाढ केले जाऊ शकते जे दरवर्षी 8.3% पर्यंत मिळू शकते. इथे हे लक्षात घ्या की, जर FD व्याजातून एका वर्षात 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर नियमानुसार त्यावर TDS कापला जाईल.
ICRA ने ‘AA-‘ रेटिंग दिले
क्रेडिट रेटिंग एजन्सी असलेल्या ICRA कडून Hawkins Cookers Ltd च्या या FD योजनेसाठी ‘AA-‘ हे स्टेबल रेटिंग दिले आहे. हे रेटिंग गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. दरम्यान, काल बीएसईवर Hawkins Cookers Ltd च्या शेअर्समध्ये 1.24 टक्क्यांनी वाढ होऊन 5,840.00 रुपयांवर बंद झाले. तसेच गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, 2022 च्या सुरुवातीपासून यामध्ये 4.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
RBI कडून या वर्षी रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, ज्यानंतर गेल्या काही महिन्यांत जवळपास सर्वच बँकांनी आपल्या एफडीवरील व्याज दरात वाढ केली आहे. मात्र, Hawkins Cookers Ltd ने आपल्या एफडी योजनेवर गेल्या वर्षीप्रमाणेच दर देऊ केला आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hawkinscookers.com/Fixed_Deposit_Scheme_Menu_2021.aspx
हे पण वाचा :
Penny Stock : फक्त 2 रुपये किंमत असलेल्या ‘या’ शेअर्सने डिव्हीडंड देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत झाले बदल, आजचे नवीन भाव तपासा
Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी
PPF मध्ये जमा केलेले पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
आता अशा प्रकारे WhatsApp वर पाठवलेले मेसेजही Edit करता येणार !!!