नवी दिल्ली । जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोविचने आपल्या खेळाच्या बळावर टेनिसप्रेमींच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. जगातील महान टेनिसपटूंपैकी एक असलेला नोव्हाक जोकोविच आज 22 मे 2021 रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा करीत आहे. जोकोविच सध्या जगातील पहिल्या क्रमांकाचा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचा जन्म 22 मे 1987 रोजी बेलग्रेड, सर्बिया येथे झाला होता. त्याने आतापर्यंत 18 ग्रँड स्लॅम एकेरीची विजेतीपदे जिंकलेली आहेत.
जोकोविचचा जन्म 1987 साली सर्बियातील बेलग्रेड येथे झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याने टेनिस खेळण्यास सुरूवात केली आणि सतत चांगली कामगिरी बजावत जागतिक पटलावर स्वतःची ओळख मिळविली. जोकोविचने नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, एकदा फ्रेंच ओपन, पाच वेळा विम्बल्डन तर तीन वेळा यूएस ओपन जिंकला. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद मिळविणार्या पुरुषांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्बियन दिग्गज जोकोविचने वयाच्या 18 व्या वर्षी पहिले एटीपी जेतेपद जिंकले. एटीपी क्रमवारीत जोकोविच हा आपल्या देशातील पहिला टेनिसपटू आहे. इतकेच नव्हे तर पुरुष गटात ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्बियाचा देखील पहिला खेळाडू आहे.
जोकोविचच्या फॅमिली विषयी बोलायचे तर त्याने 2014 साली आपली मैत्रीण आणि मॉडेल येलेनाशी लग्न केले. तो आपल्या पत्नीपेक्षा एक वर्षाने लहान आहे. त्यांना आता दोन मुले आहेत. जोकोविच याच्या मुलाचे नाव स्टीफन आहे तर मुलीचे नाव तारा आहे.
सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद मिळविणार्या पुरुष खेळाडूंच्या यादीत जोकोविच तिसर्या क्रमांकावर आहे. यामध्ये स्विस स्टार रॉजर फेडरर (20) पहिल्या तर स्पॅनिश स्टार नदाल (19) दुसर्या क्रमांकावर आहेत.
जोकोविच थोडा भावनिक आहे आणि त्याचप्रमाणे मोठ्या मनाचा देखील आहे. त्याची एक फाउंडेशन आहे जी गरिबांना मदत करते. कोरोनाच्या संकटाच्या वेळीसुद्धा, त्यांच्या संस्थेने अनेक लोकांना मदत केली. त्याच्या काही चाहत्यांचे म्हणणे आहे की,” तो थोडासा चिडका आहे आणि हरल्यानंतर तो स्वतःवरच रागावतो.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा