हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Bank) HDFC बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. जिच्या मालमत्तेनुसार देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून HDFC बँक ओळखली जाते. शिवाय बाजार भांडवलाच्या बाबतीत HDFC बँक तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे HDFC बँकेची ग्राहक संख्या फार मोठी आहे. जर तुमचेही HDFC बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी चुकूनही स्किप करू नका. नुकताच एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये बँकेकडून दिल्या जाणाऱ्या महत्वाच्या सेवा बंद असणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.
किती काळासाठी सेवा राहणार बंद? (HDFC Bank)
खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना E- Mail व SMS द्वारा कळविले आहे की, दिनांक ९ जून २०२४ आणि १६ जून २०२४ या दरम्यान विंडो अपग्रेडचे काम सुरु असेल आणि यामुळे बँकेकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या सेवा बंद राहतील. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेच्या मोबाईल बँकिंग आणि नेटबँकिंग सेवा या काळात बंद असतील. बँकेशी संबंधित सेवांसाठी सिस्टम अपग्रेडचे काम सुरु असल्यामुळे याचा परिणाम सेवांवर होत आहे.
बँकेची सेवा कधी मिळणार नाही?
दिनांक ९ जून २०२४ रोजी पहाटे ३.३० ते ६.३० या वेळेत ग्राहकांना २४ तास बँक सेवा उपलब्ध नव्हती. (HDFC Bank) तर येत्या १६ जून २०२४ रोजी पहाटे ३:३० ते सकाळी ७:३० अशी ४ तास ग्राहकांची गैरसोय होईल.
कोणकोणत्या सेवा राहणार बंद?
HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०२४ रोजी ग्राहकांसाठी काही महत्वाच्या सेवा बंद असतील. (HDFC Bank) यामध्ये पुढील सेवांचा समावेश आहे. बँक खात्याशी संबंधित सेवा, बँक खात्यात जमा करणे, निधी हस्तांतरणाशी संबंधित IMPS, NEFT, RTGS सेवा, बँक पासबुक डाउनलोड, बाह्य व्यापारी पेमेंट सेवा, झटपट खाते उघडणे, UPI पेमेंट संबंधित सेवा पूर्णपणे बंद राहतील.