HDFC Bank | HDFC बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देत असते. त्याचप्रमाणे या सुविधांमध्ये वेळोवेळी बदल देखील करत असते. अशातच स्वतः एचडीएफसी बँकेने त्यांचे क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे. बँकेने बदललेले हे नियम 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होणार आहे. क्रेडिट कार्ड चार्ज करण्याच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेली आहे. आता या एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या (HDFC Bank ) नियमांमध्ये काय बदल होणार आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
भाडे व्यवहार | HDFC Bank
हे भाडे व्यवहार भरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराच्या रकमेवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल. प्रति व्यवहारांवर त्यांना 3 हजार रुपयांपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
इंधन व्यवहार
इंधन व्यवहारावर 15 हजारापेक्षा कमी व्यवहारांवर कोणतेही जास्त शुल्क आकारले जाणार नाही. परंतु 15000 वरील जे व्यवहार असतील, त्यांच्या संपूर्ण रकमेवर 1 टक्का शुल्क आकारले जाणार आहे.
उपयुक्तता व्यवहार
उपयुक्तता व्यापाराच्या 50 हजारापेक्षा कमी व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. परंतु 50000 वरील व्यवहारांवर 1 टक्का शुल्क आकारले जाईल
शैक्षणिक व्यवहार
कॉलेज, शाळाच्या वेबसाईटद्वारे किंवा त्यांच्या पीओसी मशीनद्वारे थेट पेमेंट शुल्कमुक्त असणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या ॲप्स द्वारे केलेल्या व्यवहारांवर 1 टक्का शुल्क आकारले जाणार आहे.
ईएमआय प्रक्रिया शुल्क | HDFC Bank
कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये ईएमआय पर्यायच लाभ घेतल्यावर 299 पर्यंत ईएमआय प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहेत.
इतर बदल
याशिवाय, HDFC बँक त्यांच्या Tata Neu Infinity आणि Tata Neu Plus क्रेडिट कार्डमध्ये 1 ऑगस्ट 2024 पासून बदल लागू करेल. 1 ऑगस्ट 2024 पासून, Tata New Infinity HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना Tata New UPI ID वापरून केलेल्या पात्र UPI व्यवहारांवर 1.5% NewCoins मिळतील.