हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये खासगी क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या HDFC Bank चेही नाव सामील झाले आहे. कारण आता ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने आपल्या विविध कालावधीसाठीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना बँकेकडून कर्ज घेताना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. बँकेचे नवीन दर 7 नोव्हेंबर 2022 पासून लागू होतील.
HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट कालावधीच्या कर्जावरील MCLR 7.90 टक्क्यांवरून 8.20 टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, एक महिन्याच्या मुदतीच्या कर्जावरील MCLR 8.25 टक्के आणि 3 ते 6 महिन्यांच्या कर्जावरील व्याजदर 8.30 वरून 8.40 टक्के करण्यात आला आहे.
जास्त EMI द्यावा लागणार
MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. HDFC Bank
RBI ने रेपो दरात केली वाढ
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. HDFC Bank
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/borrow/popular-loans/home-loan/rate-of-interest
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर